मुक्तीकाव्य
॥ ॐ नारायण-शिव ॐ ।।
मुक्तीकाव्य एक
जन्ममृत्यु जरा व्याधी दुःखदारियमूर्खता।
संसारी इह यां वस्ती संसाराचा स्वभाव हा॥
होणारे होत जातें तें जाणारें जात राहतें।
वर्ते नेटें रहाणारें यावद् राहणें विनिर्मिलें ॥
जित्यांच्या संगतीं चिंता सुख वा दुःख मोह वा
मृतांच्या रडणें पाठीं राहटी हेच दीसते॥
भांडती तंडती लोकी झगडती परि वर्तती।
वर्धती राहती अंतीं जाणें सर्वांसी लागले ॥
झगडा-जीवनीं अल्प सुख तें बहु कोठुनी ।
आहे एक नसे एक ऐसी हे सुखवंचना ॥
जाणें त्यानें सुखें जावे गेले त्यां विसरुनिही।
तात्काल नांदती प्राणी जनाचा हा स्वभावची॥
कोणीना कोणि कोणाचा जगती तावद् हे मती
जाणूनियां शहाणे जे सांडिती सर्व वेदना ॥
वेदना सोडुनीयां जो जैशा तैशा स्थितीसही।
आधारें एक नामाच्या जगतो तोचि तो सुहद्॥
साचा आधार नामाचा अंतीं काचा नव्हें कधीं
अंतींच त्या खरें काम राम आराम अंतिंचा॥
अशाश्वत जिणे येथे देहांती पद शाश्वत।
यद्रृच्छया जिणे होय तोंवरी नाम हे बळ॥
म्हणूनी देवनिंदा वा नामत्याग घडूं नये ।
मिथ्या देहाभिमानानें सोशी तो देवची स्वये॥
यालागीं धरिती धैर्या दृढ जे देव वांछिती ।
केवळ तेची सुद्धत्तीर्थ वेदना सर्व जिंकिली॥
मुक्तीकाव्य २
॥ श्रीराम ।।
देवांसी तारिले रामे, रामें राक्षस मारिले।
रामें ऊठविलें दासां रामें सीता विनिंदिली॥
आणिला मृत्यु बापासी रामें धर्मासि पाळिलें।
जीववी शापशीळा तो शिवकोदंड भंगिले॥
म्हातारी कष्टते आई सत्कारी शबरीस तो।
लक्ष्मणा घेतला संगें भरता लाविले गृहा॥
जटायू रामकायार्थी मेला त्या अग्नि देतसे ।
आधीच कार्यसिध्दीचे सुग्रीवा राज्य दीधले॥
विराधासी कबंधासी मारुनी उत्तरा किया।
करी तो श्वापदें खाती त्रिशिरा खर दूषणा ॥
कैंपक्षी सुग्रीवाचा तो वालीची मृगया करी ।
मारीच मारिला जीवे सीता लक्ष्मणरक्षणी॥
मारिली त्राटिका प्राणे शूर्पणखारूप छेदिलें ।
विश्वामित्र मखा रक्षों तो भार्गव वितंडिला ॥
दंडितो जीवनी कोणा पाळितो मारितो कुणा ।
विरोधाभासभासी हा ऐसा रामपरिग्रह॥
अपार महिमा त्याचा अतर्क्या पालनक्रीया।
दंडिलें दिसलें ऐसें परी ना दंडिलें कधीं॥
क्रमश:
Comments
Post a Comment