मुक्तीकाव्य ॥ ॐ नारायण-शिव ॐ ।। मुक्तीकाव्य एक जन्ममृत्यु जरा व्याधी दुःखदारियमूर्खता। संसारी इह यां वस्ती संसाराचा स्वभाव हा॥ होणारे होत जातें तें जाणारें जात राहतें। वर्ते नेटें रहाणारें यावद् राहणें विनिर्मिलें ॥ जित्यांच्या संगतीं चिंता सुख वा दुःख मोह वा मृतांच्या रडणें पाठीं राहटी हेच दीसते॥ भांडती तंडती लोकी झगडती परि वर्तती। वर्धती राहती अंतीं जाणें सर्वांसी लागले ॥ झगडा-जीवनीं अल्प सुख तें बहु कोठुनी । आहे एक नसे एक ऐसी हे सुखवंचना ॥ जाणें त्यानें सुखें जावे गेले त्यां विसरुनिही। तात्काल नांदती प्राणी जनाचा हा स्वभावची॥ कोणीना कोणि कोणाचा जगती तावद् हे मती जाणूनियां शहाणे जे सांडिती सर्व वेदना ॥ वेदना सोडुनीयां जो जैशा तैशा स्थितीसही। आधारें एक नामाच्या जगतो तोचि तो सुहद्॥ साचा आधार नामाचा अंतीं काचा नव्हें कधीं अंतींच त्या खरें काम राम आराम अंतिंचा॥ अशाश्वत जिणे येथे देहांती पद शाश्वत। यद्रृच्छया जिणे होय तोंवरी नाम हे बळ॥ म्हणूनी देवनिंदा वा नामत्याग घडूं नये । मिथ्या देहाभिमानानें सोशी तो देवची स्वये॥ यालागीं धरिती धैर्या दृढ जे देव वांछिती । क...