Skip to main content

Posts

|| मुक्तीकाव्य ||

 मुक्तीकाव्य ॥ ॐ नारायण-शिव ॐ ।। मुक्तीकाव्य एक जन्ममृत्यु जरा व्याधी दुःखदारियमूर्खता। संसारी इह यां वस्ती संसाराचा स्वभाव हा॥ होणारे होत जातें तें जाणारें जात राहतें। वर्ते नेटें रहाणारें यावद् राहणें विनिर्मिलें ॥ जित्यांच्या संगतीं चिंता सुख वा दुःख मोह वा मृतांच्या रडणें पाठीं राहटी हेच दीसते॥ भांडती तंडती लोकी झगडती परि वर्तती। वर्धती राहती अंतीं जाणें सर्वांसी लागले ॥ झगडा-जीवनीं अल्प सुख तें बहु कोठुनी ।  आहे एक नसे एक ऐसी हे सुखवंचना ॥ जाणें त्यानें सुखें जावे गेले त्यां विसरुनिही।  तात्काल नांदती प्राणी जनाचा हा स्वभावची॥ कोणीना कोणि कोणाचा जगती तावद् हे मती जाणूनियां शहाणे जे सांडिती सर्व वेदना ॥ वेदना सोडुनीयां जो जैशा तैशा स्थितीसही।  आधारें एक नामाच्या जगतो तोचि तो सुहद्‌॥ साचा आधार नामाचा अंतीं काचा नव्हें कधीं  अंतींच त्या खरें काम राम आराम अंतिंचा॥ अशाश्वत जिणे येथे देहांती पद शाश्वत। यद्रृच्छया जिणे होय तोंवरी नाम हे बळ॥ म्हणूनी देवनिंदा वा नामत्याग घडूं नये । मिथ्या देहाभिमानानें सोशी तो देवची स्वये॥ यालागीं धरिती धैर्या दृढ जे देव वांछिती । क...
Recent posts

॥श्री सत्यनारायण मानसपूजा॥

 पांडुरंग जय विठ्ठल ॐ सुहृतीर्थ जय केवल ॥श्री सत्यनारायण मानसपूजा॥ सत्यनारायणा तुम्हासी पुजावे ।  मना ये स्वभावे ऐसे आज ॥१॥ आवाहन तुम्हा यावे रमावरा ।  कमली घ्यावा थारा कांचनाभ ॥२॥  हृदय कमळ सर्वात सोज्वळ ।  तेथे घननीळ विराजावे॥३॥ नामें अनंत तू अनंत रुपासी ।  वरेण्या धरीसी तनुश्याम ॥४॥ यावे विराजावे अर्घ्य पाद्य घ्यावे ।  मधुपर्क बरवे बुध्दीमन ॥५॥  विश्वाच्या उदके तुम्हांसी हे स्नान। पांची सिंधु जाण पंचामृती ॥६॥ परिमळ सर्वा पुष्पांचा आणूनी ।  अत्तरे न्हाणूनी तुम्हा काढी॥७॥ शीत संतमन उष्ण दुष्टमन ।  आापशीत उष्ण ऐसे असे॥८॥ स्नान सारीयले आता अंग पूसा । तुम्ही तो रमेशा दिगंबर ॥९॥ वस्त्र नेसवीले पीतांबर धारी । मृदुल कुसरी विणीलेंजें॥१०॥  श्रध्दा भक्ती धागे सुरंगी कोमल ।  किनारी विमल निष्ठा जर ॥११॥ बाजूबंद कटी वरी मेखला ती ।  तुळशीहार कंठी पेरवीला ॥॥१२॥  मकर कुंडले कर्णासी धरीरे । मुकुट शिरी रे रत्नखचित ॥१३॥  वैजयंती माळा कौस्तुभासहित । शेला सुखवीत तुमचे अंगा ॥१४॥  संतभाव तुम्हां पांघरुण असे ।  संकीर्तन उसे न...

|| स्वामी प. पू. केवल सुहृतीर्थ यांचे संक्षिप्त जीवनचरित्र ||

स्वामी प. पू. केवल सुहृतीर्थ यांचे संक्षिप्त जीवनचरित्र स्वामी प. पू. केवल सुहृतीर्थ (पूर्वाश्रमीचे श्री. सदाशिव गोविंद लेले) यांचे जीवनचरित्र थोडक्यात लिहिण्याचा हा प्रयत्न आहे. वास्तविक सद्गुरूंचा महिमा वर्णन करण्यास कोण समर्थ आहे? पण बरीच वर्षे लोटून गेल्यावर आतां त्यांचे समग्र अध्यात्मिक लेखन टप्प्या-टप्प्याने जनांपुढे प्रकाशित होत आहे. तेव्हां वाचकांना — ही कोण विभूती होऊन गेली? त्यांचे प्रत्यक्ष जीवन कसे गेले असेल? त्यांचा जीवनकाल कोणता? इत्यादि प्रश्न मनांत उपस्थित होणार! व त्याची यथाशक्ती परिपूर्ती करणेही क्रमप्राप्त आहे. तेव्हां सद्गुरूंस मनोमय नमन करून हे कर्तव्यकर्म सुरू करीत आहे. प. पू. केवल सुहृतीर्थ स्वामी यांचा जन्म बडोदे (गुजरात) येथे वैशाख वद्य ४ शके १८३२ दिनांक १७-५-१९११ रोजी सुसंस्कारी, आचारनिष्ठ पण गरीब घराण्यांत झाला. अगदी लहान वयांतच काळाने मातृछत्र हिरावून नेले, त्यामुळे हत मनोरथ व जीवनांतील आस्थाच संपलेल्या वडिलांना आधार देत व एक लहान भाऊ व बहीण यांच्यासाठी त्यांच्या आईची जागा भरून काढून त्यांचा सांभाळ करण्याच्या भूमिकेत प्रवेश केला. त्यामुळें लहान वयांतच प्रौढ ...